अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना १० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये; म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या १ मासापासून बेपत्ता !

अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.

आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनतेवर अन्याय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत एकाही विरोधी पक्षातील आमदारांना वाढीव निधी दिला नाही. त्यांनीच हा पायंडा पाडला.

डॉ. तात्याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्यागपत्र दिल्याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी तडकाफडकी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलै या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

गोव्यातील जलस्रोत खात्याच्या अभियंत्याची कळसा प्रकल्पाला भेट

कर्नाटक सरकार कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या माध्यमातून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू पहात आहे. कर्नाटकने हल्लीच सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) केंद्राला सुपुर्द केला आहे आणि केंद्रीय जलआयोगाने त्याला संमतीही दिली आहे !

प्रतिदिन छप्परपट्टी वसुलीला व्यापार्‍यांचा तीव्र विरोध !

राजापूर नगर परिषद लागू करू पहात असलेली करपद्धती ही छोट्या व्यापार्‍यांवर वरवंटा फिरवणारी असून या करवाढीला राजापूर शहरातील सर्व व्यापारीवर्गाने विरोध केला आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

जिल्हा न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याचा आधार घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.

रत्नागिरीत अत्याधुनिक कक्ष उभारणार ! – पालकमंत्री उदय सामंत

अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्‍यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अधिकार्‍यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्‍यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत !