खंडवा (मध्यप्रदेश) – येथे काढण्यात आलेल्या मशाल मोर्चामुळे आग लागल्याने ५० जण घायाळ झाले. आग लागल्याने येथे चेंगराचेंगरीही झाली. ही घटना २८ नोव्हेंबरच्या रात्री घडली.
आतंकवादाच्या विरोधात हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता. ‘राष्ट्रभक्त वीर युवा मंच’ने हिंदुत्वनिष्ठ नेते अशोक पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल मोर्चा काढला होता. ५ घंटे चाललेल्या या मोर्चाला भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह आणि बंगाल भाजपच्या प्रवक्त्या असणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या नाझिया खान यांनी संबोधित केले. घंटाघर चौकात मोर्चाची सांगता होत असतांना काही मशाली उलटल्या. त्यामुळे आग लागली. मशालीत लाकडाचा भुसा आणि कापूर पावडर होती, त्यामुळे आग आणखी भडकली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.