चिन्‍मय प्रभु आणि इस्‍कॉनचे १६ जण यांची बँक खाती गोठवली !

बांगलादेशकडून अटक करण्यात आलेले चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या बँकेच्‍या वित्तीय गुप्‍तचर विभागाने देशातील बँका आणि वित्तीय संस्‍थ यांना निर्देश पाठवले असून चिन्‍मय प्रभु अन् इस्‍कॉनचे १६ सदस्‍य यांची बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत. आर्थिक गैरव्‍यवहारावरून ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे म्‍हणण्‍यात आले आहे.

विभागाने देशभरातील बँकांना पाठवलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, ज्‍या लोकांची खाती गोठवण्‍यात आली आहेत, त्‍यांच्‍याशी संबंधित सर्व व्‍यवसायांची बँक खातीही बंद  केली जातील. या आदेशानुसार पुढील ३० दिवस या लोकांपैकी कुणीही कोणत्‍याही प्रकारचे व्‍यवहार करू शकणार नाही. आवश्‍यकता भासल्‍यास व्‍यवहार स्‍थगित करण्‍याचा हा कालावधी वाढवला जाईल.