उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयाचा ११वा दीक्षांत समारंभ !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना ‘विद्यावाचस्पति’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान !
हरिद्वार (उत्तराखंड) : येथील उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयाकडून अयोध्येतील ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
Uttarakhand Sanskrit University honors H.H. Swami Govind Dev Giri (@GovindaDevGiri): Conferred with the honorary degree of ‘Vidyavachaspati’ (D.Litt.)!
Haridwar (Uttarakhand) – The Uttarakhand Sanskrit University honoured His Holiness Swami Govind Dev Giri, the treasurer of… pic.twitter.com/tMHd1QNHsj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 29, 2024
येथे २९ नोव्हेंबरला सायंकाळी आयोजित केलेल्या विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत समारंभात प.पू. स्वामीजींना ‘विद्यावाचस्पति’ (डी.लिट्) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. वैदिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी प.पू. स्वामीजींना सन्मानित करण्यात आले.