आळंदी (पुणे) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी चोर्‍या !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे चालू आहे. राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरी येथे येत आहेत; परंतु या सोहळ्याच्या वेळी चोरट्यांनी भाविकांचे दागिने, रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

पालघरच्या सारीका जोशी यांचे इंद्रायणी घाटावरून २९ सहस्र २०० रुपये, कल्पना पाटील यांचे २ सहस्र ५०० रुपये आणि १ लाख १० सहस्र रुपये मूल्याचे मंगळसूत्र, वैभवी तांडेल यांचे ६ सहस्र ५०० रुपये अन् भ्रमणभाष, कल्पना तरे यांचे ५ सहस्र २०० रुपये अशा चोरीच्या घटनांची नोंद आळंदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका : 

सोहळ्यानिमित्त पोलीस बंदोबस्त असतांना अशा घटना घडतात, म्हणजेच पोलिसांचा वचक अल्प झाला आहे, हेच लक्षात येते !