नालासोपारा येथे ७ बेकायदेशीर इमारती पाडल्या !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४१ बेकायदा इमारतींवर कारवाई होणार

नालासोपारा – येथे ३० एकर जागेवर उभारलेले बेकायदेशीर अग्रवालनगर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भुईसपाट करण्यात आले. येथे बांधलेल्या ४१ बेकायदा इमारतींवर बुलडोझरने कारवाई होणार आहे. त्यांपैकी सध्या ७ इमारतींवर २८ नोव्हेंबर या दिवशी महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला. या वेळी महापालिकेचे ५० हून अधिक अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

बुलडोझरच्या कारवाईच्या वेळी काही लोक त्यांचे घर सोडण्यास सिद्ध नव्हते. या वेळी पोलीस आणि सुरक्षारक्षक यांनी स्थानिकांना घराबाहेर आणले. या वेळी स्थानिकांनीही विरोध केला; पण प्रशासनासमोर त्यांना काहीच करता आले नाही. पहिल्या दिवसाच्या कारवाईत ५० हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.

संपादकीय भूमिका

बेकायदा इमारती पाडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश द्यावे लागणारे प्रशासन काय कामाचे ?