नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू ! – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पणजी, फोंडा, डिचोली आणि म्हापसा येथील शासकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

चंद्रपूर-यवतमाळ मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर आणि समर्थक यांच्याविरोधात प्राणघातक हल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन  

असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !  

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी !

‘तांडव’ या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली.

अभिनेता सोनू सूद यांची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

सोनू सूद यांनी जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी महापालिकेची अनुमती न घेता परस्पर पालट केले.

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.

जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !

‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आणि कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.