चंद्रपूर-यवतमाळ मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर आणि समर्थक यांच्याविरोधात प्राणघातक हल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन  

असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !  

खासदार बाळू धानोरकर

वरोरा (चंद्रपूर), २१ जानेवारी (वार्ता.) – राजू कुकडे या वेबपोर्टल पत्रकारावर अवैध धंद्यांविरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी खासदार बाळू धानोरकर आणि समर्थक यांच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आणि  जिल्हाधिकारी, लोकसभा सभापती, देशाचे गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पालकमंत्री, माजी गृहमंत्री यांना मराठी पत्रकार संघाकडून निवेदन देण्यात आले.