नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

माहितीच्या अधिकाराखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली !

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते !

हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरही पाठवले जात असल्याने त्याची व्याप्तीही वाढत आहे.

भारतातील आतंकवादी कारवाया आणि त्यावरील एकमात्र उपाययोजना !

जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.

‘संविधान राजकीय लाभासाठी पालटता येणार नाही’, याविषयीचे अधिवक्ता नानी पालखीवाला यांचे उद्गार आजही तंतोतंत लागू !

‘नानी पालखीवाला हे भारतीय कायदेविश्वातील एक युग होते’, असे म्हटले, तर अयोग्य होणार नाही. इंदिरा गांधींना त्यांच्या हुकूमशाहीची व्याप्ती वाढवायची होती. त्यामुळे त्यांना संविधानात हवे तसे पालट करायचे होते.

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार !

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात येतो. अशा प्रकारे कायदेशीर कार्यात कार्यरत असलेल्या मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला का लक्षात येत नाही ?

केरळचा लोकायुक्त कायदा आणि मंत्र्याच्या विरोधात झालेली कारवाई !

मंत्री जलील यांच्या याचिका न्यायालयात न टिकल्याने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांच्या चुलत भावालाही महाव्यवस्थापकाचे पद सोडावे लागले. एका नियमबाह्य गोष्टीमुळे दोन्ही व्यक्तींना पद सोडावे लागण्याची घटना क्वचितच घडली असावी.