
ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी हिंदु बांधव सांगतात, तेव्हा ‘लग्न करणारी हिंदु युवती आणि मुसलमान युवक यांनी कुणाशी विवाह करायचा, हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे’, असा युक्तीवाद मुसलमान अन् निधर्मी विचारसरणीचे लोक करतात; मात्र जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा ‘मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा’, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो. धर्मांध आणि साम्यवादी यांची वरील प्रकारची दुट्टपी भूमिका हिंदूंनी समजून घ्यायला हवी. जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !