गोसंवर्धन आयोगाची स्थापना आणि संस्कृत शाळा चालू करा !
वारकरी संप्रदायाची राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त एकमुखी मागणी
वारकरी संप्रदायाची राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त एकमुखी मागणी
हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.
सरकार कोणत्याही विचारसरणीचे असो, देशाची राज्यव्यवस्था ही देशाचे बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाच्या दृष्टीने अनुकूल असली पाहिजे म्हणून आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल.
लोकांद्वारे, लोकांसाठी आणि लोकांचे सरकार, म्हणजे लोकशाही’, ही व्याख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी वर्ष १८६३ मध्ये केली. आज या लोकशाहीचे स्वरूप पाहिले, तर ‘लोकांचे लोकांसाठीचे राज्य ते हेच का ?’, असा प्रश्न पडतो.
हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त लावले घरोघरी दीप ! पुणे, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारि पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे ‘रामराज्य’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ यांप्रमाणे आपले जीवन आदर्श होऊन, … Read more
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.
कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. अशा स्थितीत हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक आहे.
आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया.
खटल्याच्या माध्यमातील हे युद्ध धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण याच्या जन्मभूमीसाठी करायचे आहे. १०० कोटी हिंदूंनी संघटितपणे या याचिकेला समर्थन द्यावे.
नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !