हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

रत्नागिरी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे निमंत्रण ओणी कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधीपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांना देण्यात आले. हे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत दळवी यांनी दिले.

प.पू. उल्हासगिरी महाराज यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत दळवी

निमंत्रण स्वीकारतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले,

‘‘आज हिंदूंमध्ये जागृती करण्याची आणि त्यांना धर्माचरण करण्यास सांगण्याची नितांत आवश्यकता आहे. हिंदूंवरती होणार्‍या आघातांची शृंखला पाहिली, तर हे लक्षात येते की, हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे कुणी सांगत नाही. हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होय. हे कार्य करण्याचे काम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती व्हायला लागली आहे. या सभेला उपस्थित रहाण्याची माझी इच्छा होती; मात्र माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी उपस्थित राहू शकत नसलो, तरी या सभेसाठी माझे आशीर्वाद आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने सभा निर्विघ्नपणे पार पडेल.’’