भारताच्या अणूऊर्जा क्षेत्रातील थोर सेनापती डॉ. आर्. चिदंबरम् !
डॉ. चिदंबरम् यांच्या रूपाने भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या लढ्यातील एक महत्त्वाचा सेनापती नुकताच हरवला आहे. त्यांचे ४ जानेवारी २०२५ या दिवशी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी देशासाठीचे दिलेले योगदान अतुलनीय आहे. भारताच्या अशा महान शास्त्रज्ञाविषयी माहिती जाणून घेऊया.