दहावीच्या परिक्षा असल्याचे कारण देत पोलिसांनी नाकारली होती अनुमती

कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी १६ फेब्रुवारी या दिवशी वर्धमान जिल्ह्यात होणार्या प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या सभेला अनुमती नाकारली होती. याविषयी रा.स्व. संघाच्या बंगाल शाखेने १३ फेब्रुवारी या दिवशी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १४ फेब्रुवारी या दिवशी यावर सुनावणी करत सभेला सशर्त अनुमती दिली. उच्च न्यायालयाने अनुमती देतांना सभेतील भोंग्यांचा आवाज अल्प ठेवण्याची अट घातली आहे. प.पू. भागवत सध्या बंगालच्या दौर्यावर आहेत. ते संघाच्या पदाधिकार्यांना भेटत आहेत आणि संघटनेच्या विस्ताराविषयी चर्चा करत आहेत.
प्रस्तावित सभेच्या ठिकाणाजवळ एक शाळा असल्याचे सांगून बंगाल पोलिसांनी सभेला अनुमती देण्यास नकार दिला होता. सध्या बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीची परीक्षा घेतली जात आहे. तथापि, संघप्रमुखांची सभा रविवार, १६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत व्यत्यय येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रा.स्व. संघाच्या बंगाल शाखेने म्हटले होते.
संपादकीय भूमिकाप्रखर हिंदुद्वेष्टी तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या बंगालमध्ये परीक्षांचे कारण देऊन सरसंघचालकांच्या सभेला अनुमती नाकारली जाणे, यात आश्चर्य ते काय ? |