Mohan Bhagwat On Muslims : ‘भारतमाता की जय’ म्हणणारे आणि भगव्या ध्वजाचा आदर करणारे मुसलमान शाखेत येऊ शकतात ! – सरसंघचालक

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

वाराणसी (उत्तरप्रदेश) – संघाच्या शाखेत सर्व भारतियांचे स्वागत आहे. जे मुसलमान ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देऊ शकतात आणि भगव्या ध्वजाचा आदर करू शकतात, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतात, असे उत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका प्रश्नावर दिले. सरसंघचालक वाराणसीतील लाजपत नगर कॉलनीतील संघाच्या शाखेत गेले होते. या वेळी त्यांना एका स्वयंसेवकाने ‘मुसलमान संघामध्ये सहभागी होऊ शकतात का ?’ असा प्रश्न विचारला होता.

सरसंघचालक पुढे म्हणाले की, भारतातील लोकांचे धर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाची संस्कृती सारखीच आहे. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जात यांतील लोकांचे शाखेत स्वागत आहे.