गोवा : ६ वर्षांच्या कालावधीत आमदारांच्या आजारपणावर सरकारकडून १५ कोटी रुपये खर्च !

आमदारांना आणि कुटुंबाला वैद्यकीय देयकांचे परतावा (रिफंड) दिला जातो. वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत अनेक आमदारांना वैद्यकीय देयके भरण्यासाठी १५ कोटी १५ लाख रुपये खर्च केले.

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा पालटून घेतांना २ नक्षलसमर्थकांना अटक

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद केल्‍यानंतरची ही मोठी कारवाई आहे. ३० सप्‍टेंबरपर्यंत नोटा अधिकोषात जाऊन पालटून घेण्‍याची समयमर्यादा देण्‍यात आली आहे.

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्‍या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !

मुंबईतील श्री मुंबादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी देवस्थानांच्या परिसराचा विकास करणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

मुंबईमध्ये १ एकर भूमीत अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. राज्यशासन आणि महानगरपालिका यांद्वारे हा संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

सिंधुदुर्ग : आंबोली धबधबा परिसरात कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणार  !

पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल.

आवश्यकता भासल्यास अबकारी घोटाळ्याचे अन्वेषण दक्षात खात्याकडे सोपवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

गहुंजे (पुणे) येथे क्रिकेटचे मैदान असतांना नव्याने मैदान उभारणी कशासाठी ? – नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस

स्टेडियमच्या सल्लागारासाठी, तसेच स्टेडियम उभारण्यासाठी होणारी पैशांची उधळपट्टी तात्काळ रहित करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन करेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ !

रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांकडून विविध ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

वर्ष २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे काम घराघरांत पोचवा, असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.