अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

वॉशिंग्टन – भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.

(सौजन्य : डीव्ही न्यूज इंडिया) 

भारताची आर्थिक स्थिती जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्याची अपेक्षा आणखी वाढू शकते. हाच अमेरिकेत विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवण्यामागचा मुख्य उद्देश आहे, असेही या संघटनांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील कॅलिफॉर्निया, टेक्सास, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या ४ राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते.