चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

परभणी येथे आर्थिक व्‍यवहारांद्वारे वैयक्‍तिक मान्‍यतेत अपहार करणारे २ शिक्षणाधिकारी निलंबित !

निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्‍हा अशा अधिकार्‍यांचे स्‍थानांतर करणे, यांमुळे भ्रष्‍ट अधिकार्‍यांच्‍या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई करायला हवी.

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !

राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाचणे ग्रामपंचायतीचा मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श ! – सचिन जाधव

नाचणे ग्रामपंचायतीने सिद्ध केलेला मैला गाळव्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे. जिल्हा पथकाने या प्रकल्पासाठी चांगले योगदान दिले आहे, असे मत पथकप्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले.

चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

नाशिक येथे एफ्.डी.ए.च्‍या पडताळणीत आढळलेले ३ सहस्र २० लिटर भेसळयुक्‍त दूध नष्‍ट !

एका वाहनात प्रथमदर्शनी दुधात भेसळ केल्‍याचे उघड झाले. टँकरमधील दुधाचा नमुना विश्‍लेषणासाठी घेऊन उर्वरीत १ लाख १३ सहस्र २५० रुपये किमतीचा ३ सहस्र २० लिटर साठा नाशवंत असल्‍याने जनआरोग्‍याच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जागेवरच नष्‍ट करण्‍यात आला

भारताने साहाय्य केले नसते, तर आणखी एक रक्तपात झाला असता ! – महिंदा अभयवर्धने

भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले.

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !

या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक,शिवसृष्टी, वढु बुद्रुक येथील स्मारका, अष्टविनायक, श्री क्षेत्र जेजुरी यांचा विकास होणार असून वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.