Pakistani Man Killed Hindus In Dubai : दुबईमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने धार्मिक घोषणा देत केली २ हिंदूंची हत्या, तर एक घायाळ

हत्या झालेले हिंदू श्रीनिवास आणि अष्टपु प्रेमसागर

दुबई (संयुक्त अरब अमिरात) – येथे एका पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीने धार्मिक घोषणा देत ३ भारतीय हिंदु कामगारांवर तलवारीने आक्रमण केले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर तिसर्‍यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना ११ एप्रिल या दिवशी येथील एका बेकरीत घडली. अष्टपु प्रेमसागर आणि श्रीनिवास अशी मृत भारतियांची नाव आहेत. ते दोघेही तेलंगाणा राज्यातील आहेत. घायाळ झालेल्याचे नाव सागर आहे. या हत्येमागे धार्मिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. हत्या करणारा पाकिस्तानी या भारतियांचा सहकारी आहे. ‘या प्रकरणात त्याच्यावर काय कारवाई केली जात आहे’, याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या संदर्भात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पोस्ट करून माहिती दिली आहे, तसेच परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलणे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालय दोघांचे मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल भारतातच हिंदू सुरक्षित नाहीत, तर दुबईसारख्या इस्लामी शहरात तरी ते कसे सुरक्षित असणार ?