China India Relations : चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची दिशा सकारात्मक ! – चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) : गेल्या एका वर्षात चीन आणि भारत यांच्यातील संबंध सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहेत, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी लंडन येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‘भारताला चीनसमवेत स्थिर संबंध हवे आहेत.’ त्यानंतर चीनकडून वरील विधान करण्यात आले.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की,

दोन्ही देशांनी परस्पर यश मिळवण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना पाठिंबा द्यावा, एकमेकांना दुर्बल करण्याचा प्रयत्न करू नये. ‘ग्लोबल साऊथ’च्या (दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश, आफ्रिकेतील देश, आसियान देश, ओशनिया बेट राष्ट्रे, भारतीय उपखंडातील देश, आखाती देश, चीन आदी देशांचा समूह) विकासाला चालना देण्यासाठी चीन आणि भारत यांनी एकत्र यावे. दोन्ही देशांमधील सीमावाद हा त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचे निर्धारण करणारा एकमेव घटक नसावा. भारत आणि चीन यांनी एकमेकांविरुद्ध सावध रहाण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करावे.

संपादकीय भूमिका

चीनने काहीही म्हटले, तर तो विश्वासघातकी देश असल्याने त्याच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही !