पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव कोरेगाव भीमा प्रकरणातून वगळल्याचे प्रकरण !
सांगली, ६ मे (वार्ता.) – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव वगळल्याचे समोर आले आहे. यामुळे पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ ब्राह्मणद्वेषातून पू. गुरुजी यांच्यावर आरोप करत होते, तसेच गुरुजींना सूत्रधार भासवून दोन समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचे काम करत होते, हेच सिद्ध झाले. पू. गुरुजींच्या निर्दाेष मुक्ततेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच खरी जातीयवादी आहे, हे समोर आले आहे, असे परखड मत माजी आमदार नितीन शिंदे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना व्यक्त केले.
श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’