स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

  • हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !
  • स्वामी विवेकानंद यांचा अवमान करणार्‍या धर्मांध सनाउल्ला यांचे केवळ निलंबन न करता त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !

 

रायचुरू (कर्नाटक) – रायचुरू जिल्ह्यातील लिंगसुगुरू येथील शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण करून ते सरकारी, तसेच अनुदानित शाळा यांच्या ‘व्हॉट्सॲप’ गटांमध्ये प्रसारित केले.

या प्रकरणी रायचुरू जिल्ह्याचे सार्वजनिक सूचना उपसंचालक वृषभेंद्रय्या यांनी सनाउल्ला यांना निलंबित केले. १२ जानेवारीला झालेल्या स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीला त्यांच्या जीवनाविषयी सनाउल्ला यांनी अवमानकारक लिखाण प्रसारित केले होते.