धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे.

पिंपरी शहरात दहशत पसरवणार्‍या दोन टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळी यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराला अटक

सहस्रो रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

अभिनेता सोनू सूद यांच्यावर येथील महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यातच १३ जानेवारी या दिवशी सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या वेळी सूद यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.

पंढरपूर येथील वाळू चोरी प्रकरणातील ३६ गाढवांची उटी येथे रवानगी

वाळू चोर वाळूची चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेकडून अत्याचार केल्याचा आरोप 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

गोरेगाव (जिल्हा हिंगोली) येथे निवडणुकीच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा नोंद  

‘तू आमच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक का लढवतो ?’ या कारणावरून ६० जणांनी मारहाण केली.

पवई (मुंबई) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

आमदार राम कदम यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केल्यामुळे टीका

‘बार्क’चे माजी अधिकारी दासगुप्ता मुख्य सूत्रधार ! – पोलिसांचा आरोप

मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.