लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनीअंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता हे ४ आधारस्तंभ आहेत. अलीकडे काही घटना पाहिल्या, तर हे चारही आधारस्तंभ निखळतात कि काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार प्रविष्ट

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ! – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

जतमध्ये (जिल्हा सांगली) सराफाचे सव्वा दोन कोटी रुपयांचे सोने लुटले

यातून चोरांना पोलिसांचा धाक नाही, असेच यातून दिसते. ही स्थिती दूर करण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देणे आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित करण्याची आवश्यकता आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण !

महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल,

पक्षातील सहकार्‍यांना विश्‍वासात घेऊन मुंडे यांच्याविषयी निर्णय घेऊ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर आहेत.-शरद पवार

नागपूर येथे नायलॉन मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू

नायलॉन मांजा वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

वणीत धर्मांध क्रिकेट बुकींना अटक

क्रिकेटच्या सट्ट्यातही धर्मांधांचा सहभाग !
जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने विशेष पथकाने आमेर हॉटेलमधून ४ धर्मांधांसमवेत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.