फ्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये तिकीट निरीक्षकाला मारहाण करणारे २ तरुण कह्यात

शासकीय कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यांना कडक शिक्षा झाल्यास असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही !

मुंबई – मुदत संपलेल्या पासने प्रवास करणार्‍या तरुणांना पकडल्यामुळे तिकीट निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना फ्लाईंग राणी या एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी चिन्मय बारी आणि धीरेंद्र पाटील या तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

अन्य एका घटनेत बनावट पासने लोकल प्रवास करणार्‍या २१ वर्षीय वैभव शाह या तरुणाला वसई रोड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या विद्यार्थ्यांच्या भ्रमणसंगणकामध्ये ६ अत्यावश्यक सेवेची ओळखपत्र सापडली.