मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी चालू केली ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

पुणे – थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाला प्रारंभ केला. म. फुले यांनी त्यांचे अनुकरण केले. थोरले प्रतापसिंह महाराजांनी सातार्‍याच्या राजवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा चालू केली. याच राजवाड्यात राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले, असे उद्गार भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. पुणे येथील भिडे वाड्यात भेटीसाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अनुद्गार काढणार्‍यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.