तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानने चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ‘मंदिरात यापुढे अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य किंवा अश्लील वस्त्रधारी तसेच ‘हाफ पॅन्ट बर्मुडाधारकांना’ मंदिरात प्रवेश नाही’, असा फलक मंदिर परिसरात लावला असून त्यावर ‘कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा’, अशी विनंतीही या फलकाद्वारे मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात आली.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी https://t.co/lVpuDbukBR #tuljapurnews #maharashtranews
— ABP माझा (@abpmajhatv) May 18, 2023
यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे. ‘तरुणांना चाकरी कधी देणार ते सांगावे ? तरुण आणि तरुणी यांना अक्कल असते. काय घालावे आणि काय घालू नये हे त्यांना कळते. धर्माच्या ठेकेदारांचे ढोंगी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. त्यामुळे असले चाळे त्यांनी बंद करावेत’, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (वैद्यकीय क्षेत्र, न्यायालय, शाळा इथे ‘ड्रेस कोड’ असतोच ना ! तिथे आपण नियम पाळतोच ना, त्याचप्रकारे मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठीही वस्त्रांविषयीही नियम आवश्यक आहेतच ! अर्थात् ज्यांचे राजकारण लांगूलचालनावरच चालते, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक)
(म्हणे) ‘कोणते कपडे घालायचे, हे व्यक्तीस्वातंत्र्य !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड
मंदिरात लोक श्रद्धेने येतात. कुणाला कपडे घालायचे हे त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी कोणते कपडे घालावे, हे इतरांनी ठरवू नये. (मंदिरांमध्ये वेशभूषा कशी असावी ? याचे नियम घालून देणे, हे मंदिरांचे स्वातंत्र्य आहे. त्याविषयी इतरांनीही मतप्रदर्शन करू नये ! – संपादक)
तुळजाभवानी मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी; तृप्ती देसाई यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
👉https://t.co/ekCcrwtf04@triptidesai77 @bhumatabrigade @CMOMaharashtra @tbdnews pic.twitter.com/V05XgjxPaB
— Tarun Bharat News (@tbdnews) May 18, 2023
संपादकीय भूमिकामंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णय ! |