शनिशिंगणापूर देवस्थान गर्दीवर नियंत्रणासाठी वास्तूविशारद नेमणार
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना !
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना !
रासायनिक वज्रलेपनाचे प्रयोग सातत्याने फसत असतांना तो पुन्हा नवीन ठिकाणी करण्याच्या प्रशासनाच्या अट्टहासामुळे धर्महानी होत आहे !
हा आहे मंदिर सरकारीकरणाचा परिणाम ! कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनैश्चर देवस्थानामध्ये भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा अपहार होणे, हा अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार आहे !
गुन्हेगारांना कडक शिक्षा दिल्यासच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण होईल !
याचिकार्त्यांच्या वतीने अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, निवडून आलेल्या विश्वस्तांचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता न्यासावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
वक्फ बोर्ड आणि मदरसे येथे भ्रष्टचार अन् चुकीच्या गोष्टी चालत असल्याचे अनेकदा उघड झाल्यानंतर कधी कुठल्या प्रशासनाने कधी अशी ‘तातडीची’ कारवाई केली आहे का ?
एक सरकारी कार्यालय नीट चालवू न शकणारे प्रशासन हिंदूंची मंदिरांचे व्यवस्थापन कधी करू शकेल का ? सरकारने कुठली मशीद किंवा चर्च यांमध्ये अनियमितता होत असल्यावर ते कह्यात घेतले आहे का ?
शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मासिक मानधन तत्त्वावर ६ अधिकृत पुजारी यांची निवड केली आहे. त्यांना दक्षिणा मिळणार नाही. शनिदेवाला अभिषेक, पूजन करण्यासाठी देवस्थानाची १०० रुपयांची पावती घेणे आवश्यक आहे. याची कार्यवाही ६ सप्टेंबरपासून चालू झाल्याची माहिती ‘शनिशिंगणापूर देवस्थान’चे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली आहे.
२३ ऑगस्टला श्रावणात शनि अमावास्येचा योग जुळून आल्याने शनिशिंगणापूरला यात्रौत्सव आहे. त्यासाठी विश्वस्त, देवस्थान प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांच्या वतीने नियोजन चालू आहे. शनि अमावास्येनिमित्त ४ लाखांहून अधिक भाविक शनिदेवाच्या दर्शनाला येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१ ऑगस्ट २०२४ या दिवशी लागू केलेल्या वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटी, महागाई भत्ता, कालबद्ध पदोन्नती आदींसह ८ मागण्या घेऊन शनिशिंगणापूर येथील ‘शनैश्वर देवस्थाना’चे कर्मचारी साखळी उपोषणास बसले होते.