आरोपी वाल्मिक कराड याला विशेष वागणूक दिल्याचा आरोप

नाशिक : १४ डिसेंबर २०२४ ला दत्तजयंती असल्याने केंद्रात दत्तजयंती उत्सव आयोजित केला होता. यात सहस्रो भाविक सहभागी झाले होते. त्या वेळी आम्ही कुणालाही विशेष वागणूक दिलेली नाही किंवा मुक्कामाची सोय केलेली नाही. २७ डिसेंबरला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आमच्याकडे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे ते त्यांना देण्यात आले. त्या चित्रीकरणामध्ये वाल्मिक कराड येऊन गेल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. दत्तजयंतीच्या निमित्ताने कराड कदाचित् अन्य भाविकांप्रमाणे दर्शनासाठी येऊन गेला असेल; मात्र तो मुक्कामी होता, त्याला विशेष वागणूक दिली, या तृप्ती देसाई यांच्या आरोपात काही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण दिंडोरी आश्रमाचे आबासाहेब मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिले आहे. वाल्मिक कराड याला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आबासाहेब मोरे पुढे म्हणाले,
‘‘तृप्ती देसाई यांनी शनिदेवाला सोडले नाही, तर आम्ही कुठे आहोत ? आम्ही इथे सामाजिक उपक्रमही राबवतो त्याची माहिती लोकांना आहे. तृप्ती देसाई यांनी लैंगिक शोषणाच्या संदर्भात केलेले सर्व आरोप खोटे असून सदरचा प्रकार हा सेवेकरी परिवारातील एका व्यक्तीच्या संदर्भात घडला होता. ही घटना पुढे मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर ज्यांनी तक्रार केली होती त्यांनी पुढे न्यायालयीन प्रक्रियेत क्षमा मागितली आहे.’’
संपादकीय भूमिकायातून तृप्ती देसाई यांचा हिंदुद्वेष्टेपणा जाणवतो. कोणत्याही पुराव्याविना ऊठसूठ हिंदूंवर, हिंदूंच्या आश्रमांवर टीका करणार्या तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तरच इतरांना वचक बसेल ! |