चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे !

ब्रेग्झिटचे पडसाद !

ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !

ब्रिटनचे ‘पाकिस्तानी ‘ऑफकॉम’!

पाक हा आतंकवाद जोपासणारा, आतंकवादी हाफीज इत्यादींची मानमरातब करणारा, त्यांना संरक्षण देणारा आणि आतंकवादाचे उगमस्थान असणारा, जगभरात आतंकवाद निर्माण करणारा ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहीम यांना पाक वास्तव्याला सुरक्षित ठिकाण वाटत असेल, तर तेथील प्रत्येकाला आतंकवादी म्हटल्यास वावगे काय ?

भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

ठाणे येथे भाजपच्या वतीने सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम आणि ‘वन्दे मातरम्’ गायन स्पर्धा यांचे आयोजन

भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.

अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय म्हणजे ‘छोटा भारत’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांना जे वाटते ते या विश्‍वविद्यालयातील काही धर्मांध विद्यार्थ्यांना वाटत नाही. अशांचा बंदोबस्त व्हायला हवा !

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला.

भारतात सरकार आहे का ?

‘भारतात ‘अ‍ॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.