मुंबई – हिंदी चित्रपटातील अभिनेत्री सारा अली खान यांनी ६ जानेवारी या दिवशी श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले होते. याचे छायाचित्र त्यांनी सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केले होते. त्याला त्यांनी ‘सारा के साल का पहला सोमवार । जय भोलेनाथ !’ अशी छायाओळ दिली होती.
त्यावर अब्दुल नावाच्या मुसलमानाने त्यांच्यावर टीका केली. त्याने लिहिले, ‘तू तर नरकात जाशील.’ एकाने तिच्यावर थुंकत असल्याचा ‘इमोजी’ पोस्ट केला, तर एकाने लिहिले, ‘तू मुसलमान धर्मातील नाव कशाला ठेवले आहे ? तू तुझे नाव पालट.’ एलेक्स रेहान याने म्हटले, ‘तू हिंदु आहेस का ? तू हे सर्व करणे बंद कर आणि नमाजपठण कर.’
याही आधी त्यांनी शिवालयात पूजा करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले होते, तसेच श्री गणेशमूर्तीची स्थापना केली होती. तेव्हाही त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.
संपादकीय भूमिकाएरव्ही हिंदूंनी इस्लामच्या संदर्भातील काही कृती केल्यास त्याला योग्य समजणारे धर्मांध एका मुसलमान अभिनेत्रीने हिंदु धर्मपूरक कृती केल्यास तिला विरोध करतात. हा ‘सर्वधर्मसमभाव’ कसा होऊ शकतो ? |