ठाणे येथे भाजपच्या वतीने सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम आणि ‘वन्दे मातरम्’ गायन स्पर्धा यांचे आयोजन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

ठाणे – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि गीता जयंती यांच्या निमित्ताने २५ डिसेंबर या दिवशी दुपारी २ वाजता भाजपच्या वतीने सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम येथील सहयोग मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता ‘वन्दे मातरम्’ गायन स्पर्धा होणार असून त्यात १८ ते ४० वयोगटातील स्पर्धकांना भाग घेण्याची संधी मिळणार आहे. या वेळी सामूहिक ‘वन्दे मातरम्’ही म्हणण्यात येणार आहे. आध्यात्मिक आघाडीचे विकास घांग्रेकर, बुद्धीजीवी प्रकोष्ठचे परिक्षित धुमे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

धुमे म्हणाले, ‘‘ही स्पर्धा व्यापक प्रमाणात व्हावी, अशी इच्छा होती; मात्र कोरोनामहामारीमुळे या स्पर्धेवर मर्यादा आल्या आहेत. एकीकडे काही लोक हिंदुत्वाची संकल्पना सोडून विशिष्ट समाजाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी अजान स्पर्धेचे आयोजन करतात; परंतु भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.’’