पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वत:चे रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली

हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी  

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे गोव्यात लावण्यासंबंधीच्या विधेयकावर गोवा शासन विचार करणार

गोवा राज्यात औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे लावण्यासंबंधी विधेयकाला अनुमती देण्यासंबंधी गोवा शासन विचार करत आहे. प्रस्तावाचा कायदा खाते अभ्यास करत आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ओडिशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या ५० व्या विजय दिनानिमित्त व्हाईस अ‍ॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा करण्यात आला सत्कार !

व्हाईस अ‍ॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल

इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !

बलुचिस्तानमध्ये बलुचींनी केलेल्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.

चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !