अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेसारख्या प्रगत देशातील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

वॉशिंग्टन – कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीने हिंदु धर्म आणि जैन पंथ यांचा अभ्यास करण्यासाठी पीठ स्थापन करण्यात आली आहे. विद्यापिठामध्ये घेण्यात येणार्‍या अध्ययन कार्यक्रमाच्या अंतर्गत या पिठाची स्थापना करण्यात आली आहे.

या पिठाच्या स्थापनेसाठी २४ भारतियांनी योगदान दिले आहे. हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्याविषयी ज्ञान असणार्‍या एका प्राध्यापकाची येथे नियुक्ती करण्यात येणार आहे.