हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदूंनो, सावधान ! इतिहास पालटला जात आहे !

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन् अश्रद्ध यांना प्रवेशबंदी करा ! – हिंदु जनजागृती समितीचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !

त्रावणकोर देवस्वम् समितीकडून मंदिरांच्या भूमीत रा.स्व. संघाकडून घेण्यात येणार्‍या प्रशिक्षणावर बंदी !

त्रावणकोर देवस्वम् समितीच्या प्रशासनातील १ सहस्र २४२ हिंदु मंदिरांच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना काम करण्यास अनुमती देणारे, तसेच शारीरिक प्रशिक्षण किंवा सामूहिक कवायत करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यांना लगाम आवश्यकच !

हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंची आरती रोखली जाणे हे संतापजनक ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही ! आरती रोखण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? आरती रोखणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !

पाकिस्तानमध्ये हिंदूंना शिवमंदिरात पूजा करण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखले !

पाकच्या खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील शिवमंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यास रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंदूंनी सुरक्षारक्षकांच्या विरोधात तक्रार केली आहे.

रावळपिंडी (पाकिस्तान) येथे हिंदूंच्या मंदिरामध्ये धर्मांधांकडून तोडफोड !

बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आपल्या मंदिरांविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करण्यास धजावणार नाही आणि वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य करणार नाही, असे प्रभावी संघटन झाले पाहिजे. मंदिर विश्‍वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.