देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन् अश्रद्ध यांना प्रवेशबंदी करा ! – हिंदु जनजागृती समितीचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍या घटना !

मुंबई – कर्नाटकातील मंगळुरू येथील कोरगज्जा मंदिरात अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली. नवाज (मृत), अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक या युवकांनी कोरगज्जा मंदिरातील दानपेटीमध्ये आक्षेपार्ह वस्तू टाकून मंदिराचे पावित्र्य भंग केल्यामुळे केवळ मंगळुरूच नाही, तर देशभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ही एकमात्र घटना नसून अशा अनेक घटना कर्नाटक राज्यात उघड झाल्या आहेत. यामुळे समाजात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने अशी कृत्ये करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही, तर प्रशासनाला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदिरांचे पावित्र्यरक्षण व्हावे आणि कोरोना महामारीच्या आपत्काळात कायदा-सुव्यवस्थेवर अधिक ताण येऊ नये; म्हणून देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये ‘अहिंदूंना आणि देवावर श्रद्धा नसलेल्यांना प्रवेशबंदी करावी’, असे आवाहन देशभरातील मंदिर विश्‍वस्तांना हिंदु जनजागृती समितीने केले आहे. समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत याविषयी मोहिम राबवण्यात येणार असून समस्त मंदिर विश्‍वस्त आणि भक्त यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.

❗ कर्नाटकमध्ये धर्मांध मुसलमानांकडून मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍या घटना

❗देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन्…

Posted by Hindu Janajagruti Samiti Sindhudurg on Monday, April 5, 2021

श्री. रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. मंगळुरू येथील धर्मांधांनी मंदिरात केलेली कृत्ये ही हिंदूंच्या श्रद्धास्थानांची हेतूतः विटंबना करणारी आहेत. अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता; पण हिंदू सहिष्णु असल्याने येथील वातावरण शांत आहे. आता मात्र अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत.

२. आम्ही समस्त मंदिर विश्‍वस्तांना आवाहन करत आहोत की, हिंदु मंदिरांच्या बाहेर ‘अहिंदु आणि अश्रद्ध यांना प्रवेशबंदी आहे’ असा मोठ्या अक्षरांतील फलक लावावा. तसेच त्याचे बलपूर्वक उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी. समिती यासंदर्भात मंदिर विश्‍वस्तांच्या बैठका घेऊन देशभर जनजागृती करणार आहे.

काय घडले होते कोरगज्जा मंदिरामध्ये !

कोरगज्जा मंदिर

कोरगज्जा मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी नवाज, अब्दुल आणि तौफिक हे ३ जण गेले. त्यांनी मंदिरातील दानपेटीमध्ये गर्भनिरोधक टाकले. तसेच मृत्यूपूर्वी नवाज या धर्मांधाने अनेकदा या मंदिरामध्ये मलमूत्र विसर्जन केले होते. यानंतर काही दिवसांत नवाजचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला. मरण्यापूर्वी त्याने ‘भगवान कोरगज्जाचा हा शाप आहे’, असे सांगितले. त्यानंतर तौफिक यालाही रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मरणाच्या भीतीने अब्दुल आणि तौफिक यांनी पुजार्‍यांकडे जाऊन गुन्हा मान्य केला. त्यानंतर पुजार्‍यांनी खातरजमा केल्यावर पोलिसांना बोलावून या धर्मांधांना पोलिसांच्या कह्यात दिले. सर्वधर्मसमभावाची बांग देणार्‍या एकाही मुसलमान नेत्याने याविषयी साधा खेदही व्यक्त केलेला नाही, याकडेही श्री. शिंदे यांनी लक्ष वेधले.