कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

धर्मांधांवर कठोर कारवाई न झाल्यास हिंदूंची आंदोलनाची चेतावणी

  • हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंची आरती रोखली जाणे हे संतापजनक ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही !
  • आरती रोखण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? आरती रोखणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !
  • हिंदूंनी या घटनेतून बोध घेऊन ‘आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही’, हे जाणावे !

कल्याण, २९ मार्च (वार्ता.) – येथील श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. २८ मार्च या दिवशी होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करून मंदिरात आरती करत होते; मात्र या वेळी तेथे आलेल्या धर्मांधांच्या जमावाने ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा देत हिंदूंना धक्काबुक्की करत आरती रोखली. (मंदिरामध्ये येऊन ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देणार्‍या धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! – संपादक) या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले आक्रमण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असे समीर भंडारी यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाणे येथे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (कायद्याचे भय न उरलेले धर्मांध ! – संपादक) संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास हिंदूंनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक)

१. प्रथेप्रमाणे होळी पौर्णिमेच्या निमित्ताने २५ हिंदू गडावर एकत्र आले होते; मात्र कोरोनाचे कारण सांगत पोलिसांनी ५ जणांना मंदिरात प्रवेश करून आरती करण्यासाठी अनुमती दिली होती. त्यानुसार आरती चालू करण्यात आली.

२. तेथे धर्मांधांचा जमाव एका मशिदीमध्ये एकत्र आला होता. आरती चालू असतांनाच ५० ते ६० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत धक्काबुक्की करत हिंदूंना आरती करण्यापासून रोखले.

३. पोलिसांनी हिंदूंना तेथून निघून जाण्याची विनंती केल्यावर हिंदू निघून गेले; मात्र नंतर येथे धर्मांधांकडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला. (पोलिसांनी अशा प्रकारची विनंती धर्मांधांना का केली नाही ? कि ते धर्मांधांना घाबरले ? – संपादक)

४. ‘हिंदूंची गडावरील आरतीची परंपरा खंडित करण्याचा हा पूर्वनियोजित कट असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोरोनाचे नियम न पाळता मंदिरात घुसून आरती रोखणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठांकडून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून धर्मांधांवर गुन्हे का नोंदवत नाहीत ? अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, ही अपेक्षा ! – संपादक)

५. ‘सीसीटीव्ही आणि पोलिसांकडील चित्रीकरण पडताळून संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी हिंदूंना दिले आहे. (पोलिसांच्या आश्‍वासनावर विश्‍वास न ठेवता हिंदुत्वनिष्ठांनी हे प्रकरण लावून धरावे. – संपादक)