Tensions In Bengal Over Saffron Flag : बंगालमध्ये बसगाडीवरील श्रीरामाचे चित्र असलेला भगवा झेंडा काढल्याने तणाव

कोलकाता (बंगाल) – येथे  श्रीरामनवमीच्या वेळी एका बसगाडीवर लावण्यात आलेला भगवा झेंडा काढून टाकण्याची घटना घडल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. भाजपने आरोप केला आहे की, ममता बॅनर्जी सरकारच्या समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीत भगवा झेंडा बलपूर्वक काढला. या झेंड्यावर भगवान श्रीरामाचे चित्रही होते.

संपादकीय भूमिका

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे. केंद्रातील भाजप सरकारने हे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी, असेच हिंदूंना वाटते !