Jadavpur University Ram Navami Row : कोलकाता येथील प्रसिद्ध जादवपूर विद्यापिठाच्या परिसरात श्रीरामनवमी साजरी करण्यास विद्यापिठाने अनुमती नाकारली !

  • विद्यापिठात ईद आणि इफ्तार मेजवानी आयोजित होऊ शकते, तर श्रीरामनवमी का साजरी केली जाऊ शकत नाही ? – विद्यार्थ्यांचा प्रश्न

  • गेल्या वर्षीही नाकारली होती अनुमती !

कोलकाता (बंगाल) – येथील जादवपूर विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या परिसरात श्रीरामनवमी साजरी करण्याची योजना घोषित केली होती; मात्र विद्यापिठाने विद्यापिठाच्या परिसरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याची अनुमती देण्यास नकार दिला आहे. यावर विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या विद्यापिठात ईद साजरी करता येते, इफ्तारची मेजवानी आयोजित करता येते, तर श्रीरामनवमी उत्सव साजरा का केला जाऊ शकत नाही ?

विद्यापिठात साजरी केली गेलेली इफ्तार मेजवानी

१. ३ एप्रिल या दिवशी जादवपूर विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारण्यात आली. यासाठी २ कारणे देण्यात आली. एक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी अशी अनुमती देण्यात आली नव्हती. दुसरे म्हणजे सध्या कुलगुरु उपस्थित नसल्याने असा नवीन निर्णय घेता येत नाही.

२. श्रीरामनवमी उत्सवाचा आयोजक असणारा विद्यार्थी सोमसूर्य बॅनर्जी म्हणाला की, या वर्षी आम्ही परिसरामध्ये रामनवमी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. या वेळी आम्ही मागे हटणार नाही. जर लोक जादवपूर विद्यापिठात इफ्तारची मेजवाणी आयोजित करू शकतात, तर आम्ही श्रीरामनवमी का साजरी करू शकत नाही ? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू.

जिहादी विद्यार्थी संघटनेचा विरोध ‘

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या कट्टर इस्लामी मानसिकतेच्या विद्यार्थी संघटनेच्या एका सदस्याने सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा कार्यक्रम आयोजित करत आहे; पण आम्ही त्यांना विद्यापीठ परिसरात श्रीरामनवमी साजरी करू देणार नाही.

संपादकीय भूमिका

बंगाल भारतात नाही, तर बांगलादेशात आहेत, अशीच तेथील स्थिती आहे, हे अशा प्रत्येक घटनांतून देशाला दिसत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !