भारतातील कुप्रसिद्ध लिब्रांडू (उदारमतवादी) दलाल आणि काँग्रेसचे पिल्लू अभिनेते प्रकाश राज यांचे एक विधान सामाजिक माध्यमांवर पुष्कळ प्रसारित होत आहे. त्यात प्रकाश राज म्हणतात, ‘‘इंडोनेशियातील ९० टक्के लोकसंख्या मुसलमान आहे. हिंदु केवळ २ टक्के आहेत. तरीही तिथे ११ सहस्र मंदिरे आहेत आणि तिथे ‘आर्.एस्.एस्.’ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) नसल्याने कधीही दंगली झाल्याचे ऐकायला मिळत नाही.’’ याच विधानाच्या अनुषंगाने वास्तव जाणून घेऊ.

१. इंडोनेशियातील बाली बेटावरील मंदिरे सुरक्षित रहाण्याचे कारण
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठ्या बेटांवर वसलेला देश आहे. तिथे एकंदरीत १७ सहस्रांहून अधिक बेटे आहेत आणि ही बेटे दूरवर पसरलेली आहेत. त्यातच एक ‘बाली’ नावाचे बेट आहे. इंडोनेशियात जे २ टक्के हिंदू असल्याचे सांगितले जाते, ते सर्व हिंदू केवळ बाली या बेटावर रहातात आणि इंडोनेशियातील ती ११ सहस्र मंदिरेसुद्धा याच बेटावर आहेत. ही सर्व मंदिरे ९ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंतची आहेत. म्हणूनच त्यांना ‘युनेस्को’च्या ‘वर्ल्ड हेरिटेज साईट्स’मध्ये (जागतिक वारसा स्थानांमध्ये) समाविष्ट करण्यात आले आहे. इंडोनेशियाला त्याच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ टक्के उत्पन्न बालीतील या हिंदु मंदिरांच्या पर्यटनातूनच मिळते आणि हेच मूळ कारण आहे ती मंदिरे सुरक्षित रहाण्याचे…! इंडोनेशियामध्ये सर्वाधिक शांतता आढळते, ती केवळ बाली बेटावरच आहे; कारण तिथे केवळ हिंदु रहातात.
२. इंडोनेशियातील इस्लामी आतंकवादी संघटनांची नावे आणि आतापर्यंत झालेले बाँबस्फोट
आता इंडोनेशियातील इस्लामी आतंकवादी संघटनांची नावे वाचा… ‘कमांडो जिहाद, जामाह इस्लामिया, जामाह अंशरुत, लष्कर जिहाद, मुजाहिदीन तन्हा रुंटूह, इंडोनेशियन मुजाहिदीन कौन्सिल, ईस्ट इंडोनेशिया मुजाहिदीन, वेस्ट इंडोनेशिया मुजाहिदीन, अबू उसवाह नेटवर्क, दारुल इस्लाम इंडोनेशिया, तुर्कीस्तान इस्लामी जिहाद, मुजाहिदीन कोमपाक, जामाह अंशरुत दौलाह.’
अ. वर्ष २००२ च्या बाली बाँबस्फोटात २०२ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील पर्यटक अन् बालीतील हिंदूंचा मृत्यू झाला होता. या घटनेत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती, ते सर्व इस्लामी आतंकवादी होते आणि त्यांनी सांगितले, ‘इंडोनेशिया हा मुसलमानबहुल देश असल्याने बाली बेटावर हिंदूंनी राहू नये.’ यासह ‘बालीतील हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारावा अथवा मरण्यासाठी सिद्ध रहावे’, अशी आतंकवाद्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी बालीतील १२ रिसॉर्ट्समध्ये अतिशय धोकादायक बाँब ठेवले होते; पण त्या हिंदू आणि पर्यटकांचे दैव बलवत्तर म्हणून केवळ एकाच रिसॉर्टमध्ये स्फोट झाला. उर्वरित बाँब तांत्रिक बिघाडामुळे फुटू शकले नाहीत.
आ. त्यानंतर ऑस्ट्रेलियन दूतावासासमोर स्फोट करण्यात आला. वर्ष २००४ मध्ये जकार्ता येथे एक मोठा कार बाँबस्फोट झाला, ज्यामध्ये आत्मघातकी जॅकेट घातलेल्या आक्रमणकर्त्यांनी बाँबस्फोटांसह शहरात स्फोट घडवून आणले. यामध्ये ३०० हून अधिक लोक मारले गेले, त्यांचे लक्ष्य ग्रीक दूतावास होते.
इ. त्यानंतर वर्ष २००९ मध्ये पुन्हा जकार्तामध्ये बाँबस्फोट झाला, जो एक साखळी बाँबस्फोट होता. त्यानंतर १३ मे २०१८ या दिवशी जकार्तामधील १२ चर्चवर इस्लामी आतंकवाद्यांनी एकाच वेळी आक्रमण केले, ज्यामध्ये १ सहस्रांहून अधिक ख्रिस्ती मारले गेले.
ई. अमेरिकेच्या साहाय्याने इंडोनेशियन सरकारने आतंकवाद्यांवर कठोर कारवाई केली आणि एक मोठी मोहीम चालू करण्यात आली. या मोहिमेत ३ सहस्रांहून अधिक इस्लामी आतंकवादी मारले गेले. जगभरात अपकीर्ती होऊ नये; म्हणून ही मोहीम इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की, इंडोनेशियामध्ये आतंकवाद्यांवर ‘नो एफ्.आय.आर्. नो हियरींग बेसिस’वर कारवाई करून कोणताही खटला चालवला गेला नाही किंवा त्यांना सरळ ढगात पाठवले गेले !
३. हिंदूबहुल भाग वगळता इंडोनेशियामध्ये शरीयत लागू !
पुढे जाऊन इस्लामी नागरिकांना खूश करण्यासाठी इंडोनेशियन सरकारने बाली बेट वगळता इतर सगळ्या मुसलमानबहुल असलेल्या बेटांवर शरीयत कायदा लागू केला. बालीमध्ये सगळे हिंदु आहेत; म्हणून तिथे शरीयत कायदा लागू नाही. हिंदूंना तिथे त्यांच्या रितीरिवाजांचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अभिनेते प्रकाश राज यांच्याकडून पसरवली जाणारी चुकीची माहिती न घेता हिंदूंनी योग्य आणि पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
– जय भालेराव, पुणे.
संपादकीय भूमिकाखोट्या कथानकांचे बिंग उघड करण्यासाठी हिंदूंनी योग्य माहितीच्या आधारे खंडण करणे महत्त्वाचे ! |