विशेष संपादकीय : हिंदु राष्ट्राची गुढी उभारूया !

गुढीपाडवा म्हणजे मांगल्य, नवचैतन्य, उल्हास आणि आनंदाचा दिवस. समस्त हिंदु समाज मग तो श्रीमंत असो वा गरीब, स्वत:च्या घरापुढे नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो. भव्य शोभायात्रा, त्यामध्ये विविध सांस्कृतिक चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम आदी वाद्यांचा गजर, ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘हर हर महादेव’ आदींचा जयघोष !

नववर्षाच्या स्वागताचा हा वर्षारंभ खरोखर मोठा आनंदाचा सोहळा असतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्रेतायुगात प्रभु श्रीराम रावणाचा पराभव करून सीतामातेसह अयोध्येत परतले, तो हा मंगलदिन ! केवढा मोठा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा ! ‘पृथ्वीतलावर कोट्यवधी वर्षांचा हा आध्यात्मिक वारसा जपणारा सनातन धर्म हा ईश्वरनिर्मित धर्म आहे’, याचेच हे प्रतीक आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या अंगणामध्ये उभारलेली गुढी ही केवळ उत्सवाची नाही, तर आपल्या सनातन हिंदु धर्माच्या महान संस्कृतीचे द्योतक आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. हिंदु समाज उत्साहाने आणि आनंदाने सनातन नववर्षारंभदिन साजरा करतो, हे लक्षात घेऊन ३३६ वर्षांपूर्वी औरंगजेब या क्रूरकर्म्याने हिंदूंचे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या केली. ‘इस्लाम धर्म स्वीकारावा’, या औरंग्याच्या मागणीला भीक न घालता छत्रपती संभाजी महाराज यांनी जो धर्माभिमान दाखवला, त्याची इतिहासात तोड नाही. ज्याने हिंदूंच्या राजाची हत्या करून हिंदुत्वाला नष्ट करण्याचा चंग बांधला होता, त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण आजही धर्मांध मुसलमान उघडपणे करत आहेत. यापूर्वी दबक्या आवाजात टिपू सुलतान, औरंगजेब यांना ‘शहेनशाह’ म्हणणारे उघडपणे या क्रूरकर्म्यांचे उदात्तीकरण करू लागले आहेत. अल्पसंख्यांक असूनही उघडपणे होत असलेले औरंगजेबाचे उदात्तीकरण भविष्यात बहुसंख्य झाल्यास केवळ उदात्तीकरण नव्हे, तर पुढे त्याचा कित्ता गिरवला जाईल, हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हिंदूंना गुढी उभारायची असेल, तर ती ज्या सनातन हिंदु धर्माचे प्रतीक आहे, त्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य बाळगायला हवे. त्यामुळे हिंदूंचा हा नववर्षारंभ केवळ शोभायात्रा, वाद्यांचा गजर आणि चित्ररथ यांपुरता नव्हे, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी आहे, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे.

…निर्णय घ्यावाच लागेल ! 

सद्यःस्थितीत औरंगजेबाचे उघडपणे समर्थन करणारे मोजकेच दिसत असले, तरी उर्वरित मुसलमान समाज ‘स्वत:चे नाते औरंग्याशी नव्हे, तर या भूमीचे रक्षण करण्यासाठी झटणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आहे, हे सांगायला पुढे आलेला नाही’, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. ‘औरंगजेब हा एक महान शासक होता’, असे समाजवादी पक्षाचे अबू आझमी उघडपणे महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या परिसरात म्हणतो; मात्र अबू आझमी बोलत असलेले चुकीचे आहे, हे सांगायला मुसलमानांतील एकही नेता पुढे आलेला नाही. ‘औरंगजेब अत्याचारी, धर्मांध आणि महाराष्ट्र गिळायला, म्हणजे इस्लाममय करण्यासाठी आला होता’, असे हिंदू म्हणत आहेत; मात्र किती मुसलमान हे मानतात ? यावर हिंदू कधी विचार करणार आहेत का ? औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा म्हणजे यांचा स्वाभिमान असेल, तर ही धर्मांधता भारत धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे हिंदूंना त्यांचा सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा साजरा करायला देतील, असे जर कुणाला वाटत असेल, तर हे हिंदूंचे दिवास्वप्न आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. या देशाची अस्मिता औरंगजेब नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे ‘औरंगजेबाच्या पिलावळीला ठेचण्यात राष्ट्रहित आहे’, हे सरकारला ठरवावे लागेल; मात्र त्यासाठी सरकार आणि प्रशासन यांना पराकाष्ठेने प्रयत्न करायला हवेत.

शर्थीच्या प्रयत्नांविना पर्याय नाही !

औरंगजेबाचे उदात्तीकरण हा भारताच्या इस्लामीकरणाच्या त्याच्या मनसुब्याला उघडपणे पाठिंबा होय. हे स्वप्न साध्य करण्यासाठी मुसलमान चहूबाजूंनी प्रयत्नरत आहेत. भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांना प्रस्थापित करून मुसलमानांचे संख्याबळ वेगाने वाढण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून हॉटेल्स, मॉल्सपर्यंत, फळविक्रेत्यांपासून घरापर्यंत इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करण्यासाठी येणारे या सर्व क्षेत्रांत मुसलमानांचे संख्याबळ वाढवून भारताची अर्थव्यवस्था पद्धतशीरपणे इस्लामच्या अधीन करण्याचा हा प्रयत्न आहे. अल्पसंख्यांक म्हणून गोंजारता गोंजारता देशातील बहुतांश क्षेत्रात मुसलमानांनी जम बसवला आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारानजीक पोलिसांच्या समक्ष जे पथमार्ग अडवून अन्य सर्वांना वेठीस धरतात, त्यांचा हा उद्दामपणा मुसलमान बहुसंख्य झाल्यास न्यून होईल, असे कुणाला वाटते का ? एकीकडे भारताच्या या इस्लामीकरणाचे संकट दारात आहे, तर दुसरीकडे धर्मांधांच्या उद्दामपणाला पायबंद घालण्यासाठी सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसेल, तर भविष्यात हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना वठणीवर आणण्याऐवजी पोलीस हिंदूंवरच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशी सध्याची पोलीस आणि प्रशासकीय व्यवस्था ! येत्या काळात कोणता धार्मिक हिंसाचार झाल्यास त्यामध्ये पोलीस आणि प्रशासन हिंदूंवरच दबाव निर्माण करतील, हे हिंदूंनी समजून घ्यावे. त्यामुळे येत्या काळात हिंदूंना भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याविना पर्याय नाही.

इस्लामी संघटनांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण, बांगलादेशी मुसलमानांना भारतात प्रस्थापित करणे, वक्फ बोर्डाच्या अंतर्गत हिंदूंच्या भूमी बळकावणे, हलाल प्रमाणपत्राद्वारे भारताची अर्थव्यवस्था कह्यात घेणे, लव्ह जिहादद्वारे हिंदू युवतींना जाळ्यात ओढणे, अतीवेगाने स्वत:ची लोकसंख्या वाढवणे हे सर्व प्रकार भारताला इस्लामी राष्ट्र करण्याच्या दिशेनेच चालू आहेत. त्यामुळे गुढीपाडवा हा केवळ शोभायात्रा, चित्ररथ यांपुरता सीमित न ठेवता हिंदूंच्या संघटित शक्तीचे प्रतीक होणे महत्त्वाचे आहे. हिंदुत्वाचा राजकीय सोयीनुसार वापर करणार्‍या शासनकर्त्यांना वठणीवर आणावे, त्यांना प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेण्यास भाग पाडावे आणि हिंदु धर्मावरील विविध आघातांविरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हावे. यासाठी हिंदूंनो नववर्षारंभी संकल्प करूया. भारताचा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठेवा जपण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्नरत होऊया. मोगल, इंग्रज यांच्या आक्रमणानंतर तरी हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठी जगामध्ये एक तरी देश निर्माण करूया. चला, हिंदु राष्ट्राची गुढी उभारूया !