
पाली (रायगड) – अष्टविनायकांपैकी एक असणार्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो; पण त्या पाण्याचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे ते पाणी पुष्कळ प्रमाणात गढूळ आणि दूषित झाले आहे. पाण्याच्या पाईपच्या आतील जलवाहिन्या आतून गंजल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना काळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील खडकआळी भागातील नळांना काळेकुट्ट पाणी येत आहे. बल्लाळेश्वरनगर, तसेच प्रबुद्धनगर येथील पाण्याचा रंग काळा आणि हिरवा असतो. यावर उपाययोजना म्हणून नगरपंचायतीच्या वतीने धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे पाणी काही प्रमाणात शुद्ध झाले आहे. (धरणातील पाणी सोडणे, ही तात्पुरती उपाययोजना आहे. पाण्याचे शुद्धीकरण ही कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत ! – संपादक)
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, तसेच आस्थापनांमधील प्रदूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीत घाण आणि कचरा यांचे साम्राज्य आहे. नदीतील वाळू उपशामुळे येथील नागरिक आणि जीवसृष्टी यांचे आरोग्य संकटात आहे. याच नदीकाठावर महिला धुणी-भांडीही करतात. नदीत टाकलेले निर्माल्य कुजते. यांमुळेही पाणी दूषित होत असल्याचा आरोप केला जात आहे.
संपादकीय भूमिका
|