अब्दुल रहमान याला २ हातबाँबसह अटक
फरीदाबाद (हरियाणा) – येथे गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि फरीदाबाद विशेष कृती दल यांनी संयुक्त कारवाईत अब्दुल रहमान (वय १९ वर्षे) याला अटक केली. तो इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. तो अयोध्येतील रहाणारा आहे. त्याच्याकडून २ हातबाँब जप्त करण्यात आले. तो पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.च्या (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सच्या) संपर्कात होता आणि अयोध्येतील श्रीराममंदिरावर आक्रमणाची सिद्धता करत होता. त्याने अनेक वेळा श्रीराममंदिराची गोपनीय माहिती गोळा करून ती आय.एस्.आय.ला दिली होती.