
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडचे राजधानीचे शहर असलेल्या रायपूरमध्ये गेल्या ८ वर्षांपासून अवैधरित्या वास्तव्य करणार्या ३ बांगलादेशी घुसखोरांना आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) मुंबई विमानतळावरून अटक केली. या बांगलादेशी घुसखोरांचा इराकमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. तिघांचीही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्यांची भाषा आणि जीवनशैली यांच्या आधारे बराच काळ निरीक्षण केल्यानंतर ‘ए.टी.एस्.’ने तिघांना अटक करण्यात यश मिळवले आहे. ‘ए.टी.एस्.’ने दिलेल्या माहितीनुसार महंमद इस्माईल, शेख अकबर आणि शेख अली यांनी रायपूरमध्ये त्यांचे लपण्याचे ठिकाण बनवले होते.