हिंदु नाव धारण करून धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

देहलीमधील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत आहे. देशाच्या राजधानीत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने येथेही लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

शिर्डी येथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या कह्यात

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भारतीय संस्कृती, तसेच प्रथा-परंपरा यांना वारंवार विरोध करणार्‍या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी ‘पी.एफ्.आय.’कडून लावण्यात आली बाबरी ढाचा पुन्हा उभारण्याविषयीची भित्तीपत्रके !

पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?

रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

मी एका मुलाखतीमधून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा उद्देश असा कधीच नव्हता. मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो. मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान श्रीराम नेहमीच माझ्यासाठी धार्मिकता आणि वीरता यांचे प्रतीक राहिले आहेत.

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाच्या संकेतस्थळावरून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांची विक्री

येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून चित्रांची विक्री करण्यात येते. यात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचाही समावेश आहे. यामुळे हिंदु धर्माभिमानी या आस्थापनाचा विरोध करत हुसेन यांच्या चित्रांची विक्री रोखण्याची मागणी करत आहेत.

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

गुन्हा रहित करण्यासाठी कंगनाची न्यायालयात याचिका

सामाजिक माध्यमातून द्वेषमूलक ‘पोस्ट’ केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांना कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

‘इंस्टाग्राम’वर हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याच्याकडून श्री गणेश आणि हिंदु देवता यांच्याविषयी अश्‍लील ‘पोस्ट’ प्रसारित

अशा गोष्टींविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, चर्च किंवा तिच्याशी निगडित संस्था किंवा संघटना यांपैकी कुणीही तोंड उघडत नाही ! यावरून त्यांचा सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता, ही बेगडी असते हे सिद्ध होते ! असे धर्मांधांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर बेंगळुरूमध्ये झाली तशी दंगल झाली असती.