हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू ! – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावणी

‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.

(म्हणे) ‘पूजा करणे पुजार्‍यांचा धर्म नसून धंदा आहे !’

राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवाद कसा पसरवते, याचे हे उत्तम उदाहरण आहे ! जनतेच्या हितासाठी केले जाणारे शुद्ध समाजकार्य हा राजकारणाचा उद्देश आज बहुतांश राजकारणी विसरले आहेत. राजकारणाचा ‘धंदा’ बनवणार्‍यांना अशा प्रकारे वक्तव्य करण्याचा अधिकार तरी आहे का ?

केरळ उच्च न्यायालयाचे मंदिर सल्लागार समितीच्या अनास्थेवर ताशेरे !

याचा अर्थ जर न्यायालयाने नोंद घेतली नसती, तर हा अपप्रकार चालूच राहिला असता ! यासाठीच मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील धार्मिक संस्कार यांविषयी बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आम्ही आमदार मिटकरी यांचा तीव्र निषेध करत असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

अशांकडून हिंदूंनी दागिन्यांची खरेदी का करावी ?

एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनेच्या अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ विज्ञापनात अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या कपाळावर टिकली नाही. यामुळे या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध होत आहे.

राजस्थानमध्ये घरांवर धार्मिक ध्वज फडकावण्यावर बंदी !

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्रोही निर्णय
ब्रिटिशांच्या काळात जसे निर्बंध घालण्यात आले होते, तशाच प्रकारचे निर्बंध आता काँग्रेस सरकार घालत आहे, हे लक्षात घ्या !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात मधू नावाचा हिंदु युवक घायाळ !

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतांना धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्य सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

पिसोळी (पुणे) येथे असलेल्या सांकला विस्टा सोसायटीमधील स्थापित श्री गणेशमूर्ती पोलिसांनी हटवली !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे अपेक्षित नाही. हिंदु देवतांच्या मूर्ती असुरक्षित असणे गंभीर आहे.

(म्हणे) ‘पगडी आणि टिळा यांना अनुमती आहे, तर हिजाबला काय अडचण आहे ?’ – माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय.कुरेशी

मुसलमान व्यक्ती कितीही मोठ्या पदावर गेली, तरी ती त्याच्या धर्माची बाजू सतत मांडत असतेे, याचे हे उदाहरण !