हिंदु तेजा जाग रे !

श्रीमती कमलिनी कुंडले

१. ‘प्रभु श्रीरामचंद्र सदा-सर्वदा परम पवित्रच आहेत’, अशा प्रभु श्रीरामचंद्राचा अवमान करणारे दुष्प्रवृत्तीच !

आमचा अपौरुषेय सनातन धर्म आणि आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्र यांचा कितीही अवमान केला, तरी ते त्यांच्यासमोर बलाढ्य हत्तीला पाहून भुंकणार्‍या श्‍वानाप्रमाणे आहेत. आमचा सनातन धर्म आणि प्रभु श्रीरामचंद्र सदा-सर्वदा, परम पवित्रच होते, आहेत अन् असणारच !’ खरेतर त्यांचा जे सन्मान करतील, तेच खर्‍या अर्थाने सन्मानित होतील. जे त्यांना अवमानित करत आहेत, त्यांना दुष्प्रवृत्तीचेच म्हणावे लागेल.

२. सनातन धर्म आणि मातृभूमी यांना अवकळा येण्यास निधर्मी जनताच कारणीभूत असणे

सध्या सनातन धर्म आणि प्रिय मातृभूला जी अवकळा आली आहे, त्याला ही निधर्मी जनताच कारणीभूत आहे. प्रतिक्षण होणार्‍या तिच्या पौरुषहीन मनोवृत्तीच्या षंढ प्रदर्शनातच त्याचे बीज दडले आहे. ‘धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही, साम्यवादी, समाजवादी आणि काँग्रेस असो’, असे सरकार आपले आणि आपल्या येणार्‍या भावी पिढ्यांचे सर्वांगीण रक्षण, पालन-पोषण करेल, यावर ही निधर्मी जनता अजूनही विश्‍वास ठेवते. तसेच त्यांना पुनःपुन्हा निवडून देऊन तिच्या पौरुषहीन मनोवृत्तीचे प्रदर्शन भरवते. हे जरी कटू सत्य असले, तरी हिंदूंच्या दुर्दैवाने तेच लोकप्रतिनिधींचे बळ आहे.

३. धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत !

या पाशवी बळावरच आजही धर्मांध आपल्या मानबिंदूवर तुटून पडत आहेत. हिंदूंचे मठ-मंदिरे, देवदेवता, गोमाता, साधूसंत आणि माता-भगिनी या दुष्प्रवृत्ती अन् धर्मांध यांच्यामुळेच आजही असुरक्षित आहेत. या बळावरच ते उन्मत्त होऊन सातत्याने प्रभु श्रीराम आणि त्यांची जन्मभूमी अयोध्या यांचा सातत्याने अवमान करत आहेत. हे बळ त्यांना या निधर्मी जनतेनेच, तर पुरवलेले आहे. या देशात धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता, मुली यांचे अपहरण, बलात्कार, फसवणूक आणि त्यांची विक्री हा घृणित व्यापार होत आहे. हे केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचेच फळ आहे. काँग्रेसी आणि साम्यवादी यांनी कितीही विकृत इतिहास शिकवला, तरी काळ साक्षी आहे की, गेल्या १ सहस्रहून अधिक वर्षांपासून हिंदूंच्या सर्व मानबिंदूंकडे विशेषतः महिलांकडे केवळ भोगवस्तू या दृष्टीने पहाणारे कोण आहेत, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे.

४. जनतेने श्रीराम-श्रीकृष्ण यांना पूर्वज मानण्यापेक्षा मेकॉलेला स्वतःचा पूर्वज मानण्यात धन्यता मानणे

या देवभूमीतील कोट्यवधी जनता आज पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या भोगवादी मायाजालात गुरफटलेली आहे. हिंदु भूमीतील श्रीराम-श्रीकृष्ण यांना आपले पूर्वज मानण्यापेक्षा मेकॉलेला आपला पूर्वज मानण्यात धन्यता मानत आहे. आपला धर्म, देवदेवता, देवालये, माता-भगिनी इतकेच नव्हे, तर प्राचीन राष्ट्र आणि मातृभूमीप्रती आपली काही कर्तव्ये आहेत, याचेही त्यांना भान राहिलेले नाही.

५. हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करण्याचे षड्यंत्र लक्षात घेऊन त्याचा वैचारिक प्रतिकार करण्यास सिद्ध व्हायला हवे !

या देशातील कथित विचारवंत, बुद्धीवादी, समाजसेवक आणि साहित्यिक म्हणवून घेणार्‍यांनी आपल्या बुद्धीचा अश्‍लाघ्य लिलाव मांडला आहे. जे कुणी हिंदु धर्म, देवदेवता, हिंदूंचे राष्ट्रपुरुष आणि हिंदूंवर अत्यंत नीच पातळीला जाऊन चिखलफेक करतात, ते विद्वान ठरतात. त्यांना धन-संपत्ती, उच्च पद आणि पुरस्कार विनाविलंब मिळतात. काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.

– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल.