बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनांवर आणि बांगलादेशी घुसखोरांवर गृह खात्याने कठोर कारवाई करणे आवश्यक !

अचलपूर (जिल्हा अमरावती) दंगल आणि सत्यशोधन समितीचा अहवाल !

‘अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक मुसलमानबहुल शहर आहे. या शहराला धार्मिक अशांततेचा धगधगता इतिहास आहे. दोन दशकांत येथे अनुमाने २२ ते २४ नोंदी घेण्यासारख्या दंगली घडल्या. वर्ष २००७ मध्ये झालेल्या दंगलीत तर सराफाच्या ७ दुकानांची पूर्ण राखरांगोळी झाली होती. या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी तेथील दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकावल्याच्या वादावरून हिंदु आणि मुसलमान यांच्या गटांत वाद झाला. १७ एप्रिल २०२२ या रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. यासंदर्भात सत्यशोधन समितीचा अहवाल आला आहे. या आधारावर दंगल आणि तेथील भयावह परिस्थिती याविषयी जाणून घेऊया.


पोलिसांवर दगडफेक करतांना दंगेखोर

सत्यशोधन समितीने सरकारकडे केलेल्या शिफारशी !

१.  शहरातील अवैध धंद्यांवर राजकीय दबावाविना कारवाई व्हावी.

२. अतिक्रमण हटवून रस्ते पूर्णपणे मोकळे करून शक्य तिथे रुंदीकरण करण्यात यावे.

३. सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत.

४. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करावी.

५. अचलपूर येथे बाहेरून मोठ्या संख्येने वास्तव्यास आलेल्या लोकांची संख्या किती आहे ? याची माहिती घोषित करावी. याविषयी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि यावर कारवाई करावी.

६. शहराबाहेरून येणारे काही मुल्ला आणि मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) हे शांततापूर्व वातावरण गढूळ करत असल्याने त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणावेत. त्यांचे अन्वेषण करावे.

७. बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना धर्मांधतेचे विष पेरतात. त्यामुळे त्यांच्यावर सरकारच्या गृह खात्याने कठोर कारवाई करावी.

(साभार : सत्यशोधन समितीचा अहवाल)

१. सत्यशोधन समितीने अचलपूर येथील दंगलग्रस्त भागाचा दौरा करून सत्यस्थिती जाणून घेणे

अचलपूर येथील घटनेची सत्यता शोधण्यासाठी नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, माजी साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर आणि पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचा समावेश होता. या समितीने २ ते ४ मे २०२२ असे ३ दिवस अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा हा दंगलग्रस्त भाग, तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस मुख्यालय असलेल्या अमरावती येथे जाऊन माहिती जाणून घेतली. या भेटीत समितीने १०० हून अधिक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यात हिंदु-मुसलमान समुदायांचे लोक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, आधुनिक वैद्य, शिक्षक, पत्रकार यांचा समावेश होता. या अहवालात समितीने प्रशासनाला काही शिफारसीही सुचवल्या.

२. अचलपूर येथील एका प्रवेशद्वारावर भगवा झेंडा लावल्यावरून धर्मांधांनी वाद घालणे, समवेत शस्त्रे अन् दगडही आणणे आणि पोलिसांनी मात्र कारवाई करतांना नेहमीप्रमाणे निरपराध्यांनाही अटक करणे

अचलपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहराला प्रवेश करण्यासाठी ४ भव्य दारे आहेत. त्यापैकी एका दारावर हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठ अभय माथने यांनी भगवा झेंडा लावला आणि ते वैयक्तिक कामासाठी पुणे येथे निघून गेले. हनुमान जयंती असल्याने काहींनी तेथे मोठा झेंडा लावला. या ठिकाणी अन्य पक्षाचे लोकही त्यांचे झेंडे लावत असतात; पण त्यावर आक्षेप घेतला जात नाही. त्या दिवशी (१७ एप्रिल) एका घंट्यात शेकडोंच्या संख्येने सशस्त्र धर्मांधांचा जमाव घटनास्थळी जमला. ‘बाहेरून आलेल्या धर्मांधांनी त्यांच्या ट्रकमधून शस्त्रे आणि दगडही आणले होते’, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीस घटनास्थळी अर्धा घंटा विलंबाने पोचले. सुक्यासह ओलेही जळते. त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही बाजूच्या समसमान लोकांना अटक केली. यात त्यांनी भाजपच्या २५ कार्यकर्त्यांनाही कह्यात घेतले.

३. प्रशासन आणि पोलीस यांनी सत्यशोधन समितीची भेट नाकारणे

सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार घटनेच्या दिवशी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह सुटीवर होत्या. त्यामुळे त्या दिवशी पोलीस उपायुक्त मोईद्दीन मकानदार हे आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. समितीला या दोघांशी भेटून माहिती जाणून घ्यायची होती; पण त्यांनी भेटण्यास टाळले.

४. लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी मुसलमानबहुल भागांना झुकते माप देणे

अचलपूर शहरातील विद्यमान ३९ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक अल्पसंख्य समाजाचे आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री आणि स्थानिक अपक्ष आमदार बच्चू कडू अन् पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केवळ दंगलग्रस्त मुसलमानबहुल भागात दौरा केला. ‘स्थानिक अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही त्यांचाच कित्ता गिरवत दंगलग्रस्त भागाला भेट देतांना मुसलमानबहुल भागाला झुकते माप दिले’, अशी भावना स्थानिक नागरिकांनी समितीकडे व्यक्त केली.

५. अचलपूर ही बांगलादेशी घुसखोरांची आश्रयभूमी झाल्याने हिंदूंना त्रास भोगावा लागणे

अचलपूरमध्ये आश्चर्यकारकरित्या मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. पोलिसांनी एकत्र केलेल्या माहितीनुसार बंगालच्या २४ परगणा या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात लोक अचलपूरमध्ये आले आहेत. ‘या लोकांकडील आधारकार्डवर एकाच ठिकाणचा पत्ता कसा काय आहे ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘२४ परगणा’ हा पत्ता दाखवून बांगलादेशी घुसखोरांनी बनावट आधारकार्डच्या आधारे येथे वस्ती केली आहे’, असे स्थानिकांनी सांगितले.

‘ज्या शहरात उद्योग किंवा रोजगार यांच्या मोठ्या संधी नाहीत, तेथे अशा अल्पशिक्षित लोकांचे केंद्रीकरण कोण करत आहे ?’, असा प्रश्न पडतो. सत्यशोधन समितीने याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यासंदर्भात पोलीस प्रशासनाची विपरित भूमिका होती. ‘पोलीस दरबारी त्याची कोणतीही नोंद घेतली जात नाही’, अशी स्थानिकांची तक्रार आहे. ‘शहरात सातत्याने दंगली घडत असल्या, तरी तेथे सामाजिक सलोखा कायम रहावा’, असे लोकांना वाटते. असे असतांना जाणूनबुजून कुरापत काढून मानभंग करणे, झेंडा लावण्यास अटकाव करणे अशा गोष्टी करणारी मंडळी पकडली जात नाहीत. उलट त्यांनाच राजकीय प्रोत्साहन मिळते, अशी लोकांची भावना आहे.

६. शहरात अमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असतांना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करणे आश्चर्यकारक !

अचलपूर शहरात तरुणांमध्ये गांजा आणि अमली पदार्थ यांचे व्यसन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे काही गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय आहेत. येथील पानटपऱ्यांवर सर्रास गांजा आणि अमली पदार्थ मिळतात, अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी सत्यशोधन समितीला दिली. यामागे पोलीस आणि माफिया यांचे संबंध लपून रहात नाहीत. राज्यभरात गुटखाबंदी असतांना अचलपूरमध्ये गुटखा सहजपणे मिळतो. अमरावती जिल्ह्यात गुटख्याचा अवैध कारखाना आहे. या धर्मांध कारखानदाराला अन्न आणि औषध प्रशासन विभाग अन् पोलीस यांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले जाते. अर्थात्च ‘गांजा, गुटखा आणि अमली पदार्थ यांच्या रेलचेलीमागे पोलिसांची निष्क्रीयता कारणीभूत आहे कि ते राजकीय दबावापुढे हतबल आहेत ?’, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

७. धर्मांधांचे अतिक्रमण आणि उद्दामपणा यांमुळे अचलपूरमध्ये हिंदूंचे जगणे कठीण !

७ अ. ‘लँड जिहाद’ची (भूमी जिहादची) ‘मोडस ऑपरेंडी’ (कार्यप्रणाली) : अचलपूर-परतवाडा या गावांमध्ये धर्मांधांनी सर्वाधिक अतिक्रमणे केली आहेत. एखाद्या गल्लीत चढ्या भावाने दुकान किंवा भूमी खरेदी करायची. नंतर शांत राहून आजूबाजूच्या जागा खरेदी करायच्या. कालांतराने आपले पुरेसे संख्याबळ जमले की, गुंडगिरीचा आधार घेत तेथून हिंदु दुकानदार आणि रहिवासी यांना हुसकावून लावायचे, अशी ‘लँड जिहाद’ची ‘मोडस ऑपरेंडी’ चालते, असा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला.

७ आ. व्यवसायांमधून हिंदूंना हुसकावून लावणे : येथे फळविक्री, भाजीविक्री, गवंडी काम, वाहन दुरुस्तीचे गॅरेज, भंगार व्यवसाय आणि रिक्शा चालवणे या व्यवसायांवर संपूर्णपणे धर्मांधांनी नियंत्रण मिळवले असून हिंदूंना हुसकावून लावले आहे. एखाद्या टोळीयुद्धाप्रमाणे एकेका गल्लीवर नियंत्रण मिळवले जाते. संगनमताने हिंदु व्यापाऱ्यांना हुसकावून लावले जात आहे, असे हिंदु व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

७ इ. हिंदु महिलांची छेड काढणे : धर्मांध रिक्शाचालक आणि फळविक्रेते हे हिंदु महिलांची छेड काढतात. याविषयी त्यांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली; पण त्याची नोंद घेतली जात नाही. त्यांना हटकले, तर ते १०० जणांचा जमाव घेऊन येतात आणि पीडितांनाच मारहाण करतात.

७ ई. धर्मांधांच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचा कानाडोळा : भाजी व्यवसायात मुसलमान समाज बहुसंख्येने असल्याने बाजाराची सुट्टी शुक्रवारी करण्यात आली आहे. शहरात भर वस्तीत मांसाची दुकाने अतिक्रमण करून थाटण्यात आली आहेत. भंगारही रस्त्यावर ठेवण्यात येते. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. नगरपालिका आणि पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. धर्मांध हिंदु व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन अरेरावी करतात. ‘त्यांच्या मनाप्रमाणे ऐकले नाही, तर १०० लोकांचा जमाव घेऊन येतात’, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

७ उ. मुद्दामहून अपघात घडवून वाहनचालकांकडून सहस्रो रुपये उकळणे : अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. तेथे धर्मांध रिक्शाचालक भरधाव वाहने चालवतात आणि इतर वाहनांना ‘कट’ मारतात. अपघात झाल्यावर ते वाहनचालकाशी वाद घालतात. त्यांना ५ ते १० सहस्र रुपये दिल्यावरच त्यातून सुटका होते. अशा घटना वारंवार घडल्याचे लोकांनी सांगितले. येथे पोलीस हिंदूंच्या तक्रारी घेत नाहीत आणि घेतल्या, तरी त्यावर कारवाई होत नाही.

७ ऊ. अचलपूर शहरात ‘सीसीटीव्ही’ बंद असल्यामुळे हिंसाचाराचा पुरावा न रहाणे : अचलपूर हे शहर संवेदनशील असतांना तेथील ‘सीसीटीव्ही’ बंद आहेत. २ वर्षांपूर्वी ‘सीसीटीव्ही’ लावण्याचे काम करण्यात आले; पण वीजदेयकाची थकबाकी असल्याचे सांगत महावितरणने त्यांना वीजपुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे ते चालू होऊ शकले नाहीत. ‘सीसीटीव्ही’ कार्यान्वित नसल्याने हिंसक जमावाच्या कृत्यांचा पुरावा उरत नाही.

८. आतंकवादी संघटना परत कार्यरत होणे

सत्यशोधन समितीच्या लक्षात आले की, धर्मांध कट्टरतावादी आणि बंदी घातलेल्या संघटना परत कार्यरत झाल्या आहेत. त्यात सिमीच्या सदस्यांचाही समावेश आहे. ‘या संघटनेच्या लोकांनी नवीन संघटनेचे नाव धारण करून परत कारवाया चालू केल्या कि काय ?’, अशी शंका एका पत्रकाराने बोलून दाखवली.’

(साभार : सत्यशोधन समितीचा अहवाल)

संपादकीय भूमिका

अचलपूरमध्ये दोन दशकांत २२ हून अधिक दंगली होणे, हे पोलीस आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !