Pakistan’s Hindu Minister Attacked : पाकमध्ये हिंदु राज्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर फेकण्यात आले बटाटे !

खैल दास कोहिस्तानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नवीन कालव्यांच्या योजनांना विरोध करणार्‍या आंदोलनकर्त्यांनी धार्मिक व्यवहार राज्यमंत्री खैल दास कोहिस्तानी यांच्या वाहन ताफ्यावर टोमॅटो आणि बटाटे फेकले. या वेळी आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. ही घटना थट्टा जिल्ह्यात घडली. यात कोहिस्तानी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कोहिस्तानी यांना दूरभाष करून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान म्हणाले की, लोकप्रतिनिधींवरील आक्रमण अस्वीकारार्ह आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाईल.

सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनीही या कृत्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी पोलीस उपमहानिरीक्षकांना आक्रमणात सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये सामान्य हिंदू असोत किंवा मंत्री, त्यांचा असाच अवमान केला जातो, हे जाणा !