Jharkhand Karni Sena Chief Murder : झारखंडमधील ‘रजपूत करणी सेने’च्या प्रदेशाध्यक्षांची अज्ञातांकडून हत्या

रजपूत करणी सेने’चे प्रदेशाध्यक्ष विनय सिंह

जमशेदपूर (झारखंड) – ‘रजपूत करणी सेने’च्या प्रदेशाध्यक्ष विनय सिंह यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. विनय सिंह हे येथील मिनी पंजाब नावाच्या हॉटेलजवळील एका गल्लीतूत जात असतांना आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्वेषण चालू केले आहे. या घटनेची माहिती देतांना पोलीस उपअधीक्षक वचन देब कुजूर म्हणाले की, विनय सिंह हे घरातून सकाळी लवकर निघाले होते. बराच वेळ झाला, तरी ते परतले नाहीत. त्यांचा भ्रमणभाषही बंद लागत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांचा सायंकाळी त्यांना मृतदेह आढळून आला. सिंह यांच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

करणी सेनेकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वरील डिमना चौकात ‘रस्ता बंद’ आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यानंतर मध्यरात्री १ वाजता पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

संपादकीय भूमिका

झारखंडमधील हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राजवटीत हिंदू असुरक्षित ! अशांच्या राज्यात हिंदूंना न्याय मिळणेही अशक्यच आहे !